जीभ – पाचन संस्थेचा आरसाच !

Tongue - Maharashtra Today

जिभेचे चोचले, जिभेला हाड आहे का किंवा उचलली जीभ … अशा अनेक म्हणी आपण रोज वापरत असतो. आरोग्याच्या दृष्टीने या जीभेला खूप महत्त्व आहे. आयुर्वेदात रुग्ण परीक्षण करतांना जीभेचे परीक्षण नक्कीच केले जाते. जीभ, कर्मेन्द्रीय आणि ज्ञानेन्द्रीय असे दोन्ही कार्य करणारा अवयव आहे. जीभ रसज्ञान करवते तसेच बोलण्याचे कार्य करते.

  • जीभ स्वच्छ गुलाबी असणे हे आरोग्याचे लक्षण आहे.
  • जीभ अति लालवर्णी तसेच पीत हरीत स्तर असणे
  • जीभेवर पांढरा स्तर असणे.
  • जीभेच्या कडेला व्रण किंवा सूज असणे.
  • रसज्ञान, अन्नाची चव न समजणे.
  • जीभ कोरडी खरखरीत वाटणे. जीभ काळी पडणे. जीभेला कंप असणे.

या सर्व जिव्हेच्या विकृती आहेत. पाचन व्यवस्थित होत नसेल, ज्वर असेल किंवा इतरही कोणता आजार असेल तर जीभेवर पांढरा पिवळा स्तर येऊ लागतो. शरीरात आम निर्माण झाला असल्यास जीभेवर पांढरा स्तर आपोआप दिसतो. पोट व्यवस्थित साफ होत नसेल तरीही जीभ आवरणयुक्त दिसते.

सकाळी दंत धावनावेळी आपण स्वतःच जीभेचे परीक्षण करू शकतो. जीभेवर स्तर असेल तर वैद्याच्या सल्ल्याने लंघन पाचन औषधी उपयोग करून वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे. आयुर्वेदात (Ayurveda) अष्टविध रुग्ण परीक्षेतील जिव्हेचे आरोग्य टिकविण्याकरीता नित्य दिनचर्येत जिव्हा निर्लेखन, गण्डूष, कवल कर्म सांगितले आहे.

या विधींमुळे जीभ स्वच्छ होते. जिव्हा रोग होत नाहीत तसेच रसज्ञान व बोलण्याचे कार्य व्यवस्थित होते. जीभ स्वच्छ गुलाबी हे निरोगीपणाचे लक्षण आहे तर आवरणयुक्त जीभ शरीरात दोषांचे असंतुलन दर्शवणारी आहे. शरीराच्या या आरोग्य दिशादर्शकाकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button