उद्या म्हणतील परमबीर सिंग यांचा मेंदू ‘हॅक’ केला; मुनगंटीवारांचा पवारांना टोमणा

Sharad Pawar - Sudhir Mungantiwar - Maharashtra Today

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीत येऊन गेल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर आरोप केले, असा आरोप राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. पवारांच्या या आरोपावर भाजपाचे (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी टोमणा मारला, उद्या हे लोक परमबीर सिंग यांचा मेंदू भाजपाने ‘हॅक’ केला, असंही म्हणतील!

परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत आज पत्रकार परिषद घेतली. म्हणालेत, परमबीर सिंग दिल्लीत येऊन मला भेटून गेलेत. परमबीर सिंग यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी वसुलीच्या टार्गेटचे पत्रात म्हटले; पण तो पैसा कुणाला दिला याचा उल्लेख केला नाही. फडणवीसही दिल्लीत येऊन गेले होते. ते राज्यात परतल्यानंतरच परमबीर यांनी पत्र लिहिले.

सुधीर मुनगंटीवार यांनी पवारांनी केलेले आरोप पूर्ण फेटाळले. शरद पवार यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपात तथ्य नाही. उद्या हे लोक परमबीर सिंग यांचा मेंदू भाजपावाल्यांनी हॅक केला असेही म्हणतील. पवारांनी बिनबुडाचे आरोप करू नये. या प्रकरणात आधी अनिल देशमुखांचा राजीनामा घ्यावा आणि त्यानंतरच प्रकरणाची चौकशी करावी, असे मुनगंटीवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER