उद्या ही नायिका पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार

कोरोना असला तरी बॉलिवूडमध्ये लग्नाचा सीझन मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रख्यात अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी लग्न केले होते. त्यांच्या लग्नाची महिनाभर चर्चा सुरु होती. गायक आदित्य नारायणनेही त्याची गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत याच काळात लग्न केले. काजल अग्रवाल आणि नेहा कक्कड यांनीही या कोरोना काळातच लग्न केले. या यादीत आता प्रख्यात अभिनेत्रा दिया मिर्झाचेही (Diya Mirza) नाव जोडले जाणार आहे. दिया मिर्झा उद्या म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. दिया तिचा बॉयफ्रेंड वैभव रेखी (Vaibhav Rekhi)सोबत लग्न करणार आहे.

वैभव हा एक व्यावसायिक असून गेल्या वर्षी या दोघांची एका कार्यक्रमात ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि आता लग्नात रुपांतर होणार आहे. कोरोना असल्याने दियाने अत्यंत जवळच्या आणि मोजक्याच लोकांना लग्नाचे आमंत्रण दिले असल्याचे सांगितले जात आहे.

दिया आणि वैभव या दोघांचाही हा दुसरा विवाह आहे. दियाने ऑगस्ट 2019 मध्ये पहिला पती साहिल सिंघासोबत घटस्फोट घेतला होता, खरे तर दिया आणि साहिल एकमेकांचे चांगले मित्र होते. या दोघांनी एकत्र सिनेमा प्रॉडक्शनही सुरु केले होते. ऑक्टोबर 2014 मध्ये या दोघांनी दिल्लीत भव्य समारंभात लग्न केले होते. परंतु 5 वर्षातच हे दोघेही एकमेकांपासून दूर झाले. एकमेकांपासून दूर झालो असलो तरी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असे दियाने घटस्फोट घेतला तेव्हा सांगितले होते.

दियाप्रमाणेच वैभवचेही हे दुसरे लग्न आहे. त्याला पहिल्या लग्नापासून एक मुलगीही आहे. वैभवने योगा इंस्ट्रक्टर सुनैना रेखीसोबत पहिले लग्न केले होते. मात्र काही कारणांमुळे सुनैनापासून वैभवने फारकत घेतली होती. मात्र मुलगी त्याच्याकडेच आहे. कोरोना काळात वैभव आणि दिया एकत्र आले आणि एकमेकांना डेटिंग करू लागले होते.

बॉलिवूडमध्ये दिया आणि वैभव 15 फेब्रुवारी रोजी मुंबईतच लग्न करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER