उद्या संभाजीराजे उदयनराजेंना भेटणार; भेटीचे ठिकाण ठरले

Udayanraje Bhosale - Sambhaji Raje

पुणे : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) येत्या १६ जूनपासून कोल्हापुरातून मराठा मोर्च्याला सुरुवात होणार आहे. याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) हे ११ जून रोजी (उद्या) खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांना भेटणार आहेत. पुण्यात दुपारी १२ वाजता ही भेट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण रद्द केले. त्यानंतर संभाजीराजेंनी महाराष्ट्र दौरा केला आणि सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. मात्र, संभाजीराजे आणि उदयनराजेंची भेट झाली नव्हती. आता दोन्ही राजे उद्या पुण्यात भेटून मराठा आरक्षणाच्या पुढील लढाईची दिशा ठरवणार आहेत.

दरम्यान, संभाजीराजेंनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन मराठा मोर्च्याची दिशा ठरवली. येत्या १६ जूनला कोल्हापुरातून पहिला मराठा मोर्चा निघणार. या आंदोलनाची टॅगलाईन “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींना बोलायला लागतंय” अशी असेल. लोकप्रतिनिधी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावे लागेल, असे संभाजीराजे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button