उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याची पायाभरणी

Uddhav Thackeray

मुंबई : उद्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) स्मारकातील  पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम इंदू मिल इथे होणार आहे. २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते स्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रम  झाला होता. आता महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याची पायाभरणी होणार आहे. उद्या दुपारी ३ वाजता दादर येथील इंदू मिल येथे हा कार्यक्रम होणार आहे.

आंबेडकर स्मारकाच्या सुधारित संरचनेनंतर पादपीठ आणि पुतळ्याच्या पायाभरणीचा हा कार्यक्रम असणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची पाहणी केली होती. आंबेडकरांच्या स्मारकाचं केवळ २५ टक्के काम झालं आहे. अजून ७५ टक्के काम शिल्लक आहे. त्यामुळे जर आव्हान म्हणून हे काम स्वीकारलं तर पुढील दोन वर्षांत  हे काम पूर्ण होऊ शकतं. हे स्मारक जगभरातील लोकांसाठी आकर्षण ठरेल, असं  मत पवारांनी व्यक्त केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER