येत्या दोन वर्षांत भारतातून टोलनाके हद्दपार होणार – गडकरी

मुंबई :- केंद्रीय रस्ते- वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gatkari) यांनी गुरुवारी देशभरातील टोलनाक्यांसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. येत्या दोन वर्षांत भारतातून टोलनाके (Toll Naka) हद्दपार होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासाठी जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) प्रणाली सरकार आणणार असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नव्या प्रणालीमुळे टोल तुमच्या बँकेतून कापला जाणार आहे.

रशियन सरकारसोबत याबाबत काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे दोन  वर्षांत भारत टोलमुक्त होईल. सर्व जुन्या वाहनांमध्ये जीपीएस सिस्टम बसवण्यात येणार आहे. याआधीच टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. ज्यामुळे इंधन बचत आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

फास्टॅगचा वापर झपाट्याने वाढत आहे. नितीन गडकरी यांनी म्हटलं की, टोल वसुलीसाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून एक सादरीकरण देण्यात आले. येत्या पाच वर्षांत टोलचे उत्पन्न १,३४,००० कोटी होण्याची अपेक्षा आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल, असंदेखील गडकरी यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER