फास्ट टॅगचे स्कॅनिंग न झाल्यास टोल माफ

fast Tag

मुंबई : 15 फेब्रुवारीपासून या सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग सत्ती लागू करण्यात आली आहे. फास्ट टॅग नसेल वाहनधारकांना दुप्पट दंडाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. राज्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई रस्ते विकास महामंडळाचे मिळून एकूण 108 टोल नाके आहेत. मात्र अनेक टोल नाक्यांवर फास्टॅग टोल वसुलीसाठी उभारण्यात आलेल्या यंत्रणांमध्ये कमालीचे दोष आहेत. काही काही वाहनांच्या फास्टॅगचे दोन-दोन वेळा स्कॅनिंग होऊन वाहनधारकांना दुप्पट टोलचा भुर्दंड सोसावा लागत आहे. तर काही वाहनधारकांच्या फास्टॅगचे स्कॅनिंगच होत नाही.

एखाद्या वाहनाच्या फास्टॅगचे स्कॅनिंग झाले नाही तर टोल कंपन्या संबंधित वाहनधारकांकडून दुप्पट टोल वसूल करीत असल्याच्या तक्रारी आहेत. या कारणावरून अनेक टोल नाक्यांवर रोज वादावादी आणि काही वेळा हाणामारीच्याही घटना घडू लागल्या आहेत. टोल नाक्यांवरील सदोष फास्टॅग यंत्रणेचा फटका अनेक वाहनधारकांना बसू लागला आहे. मात्र टोल कंपन्यांची ही अरेरावी पूर्णपणे बेकायदेशीर आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने 7 मे 2018 रोजीच याबाबत स्पष्ट अध्यादेश काढला आहे.

राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956(48) च्या कलम 9 अन्वये हा टोल वसुलीबाबतचा अधिनियम तयार करण्यात आला आहे. ‘महामार्ग शुल्क संग्रह नियम 2018’ असा हा अधिनियम आहे. या अधिनियमाद्वारे असे स्पष्ट करण्यात आले आहे की, ‘वाहनधारकाकडे अधिकृत फास्टॅग असेल आणि एखाद्या टोल नाक्यावर टोल कंपनीच्या सदोष तांत्रिक कारणामुळे फास्टॅगचे स्कॅनिंग होत नसेल तर असे वाहन टोल न घेता मोफत सोडण्यात यावे. संबंधित वाहनाला शुन्य रुपयांची पावती देण्यात यावी’, असे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER