टोकियो ऑलिम्पिक पुढील वर्षी २३ जुलैपासून

Tokyo Olympics to open July 23 next year

टोकियो : कोरोनाच्या प्रकोपामुळे वर्षभर पुढे ढकललेले टोकियो ऑलिम्पिक सामने आता पुढील वर्षी 23 जुलै ते 8 अऑगस्टदरम्यान होणार आहेत.मात्र त्यांना टोकियो २०२० असेच ओळखले जाणार आहे. त्यापाठोपाठ पॅरालिम्पिक सामनेसुध्दा २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान होणार आहेत.

या तारखांची घोषणा टोकियो २०२० च्या आयोजन समितीचे प्रमुख योशिरो मोरी यांनी आज केली.

नियोजीत कार्यक्रमानुसार टोकियो ऑलिम्पिक यंदा २४ जुलैपासून १६ दिवस होणार होते. पण कोरोनाच्या हाहाकारामुळे ते पुढे ढकलण्यात आले होते. आॕलिम्पिकच्या इतिहासात रद्द न होता पुढे ढकलावे लागलेले हे पहिलेच सामने आहेत.

कोरोना विषाणूमुळे जगभर हाहाकार माजल्यानंतर खेळाडू व क्रीडा महासंघांकडून हे सामने पुढे ढकलण्याची मागणी होती.