पवारांच्या सुचनेनंतर आजचा वशाटोत्सव रद्द

Today's Vashatotsav canceled after Pawar's suggestion

पुणे :  आज पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्.कर्त्यांकडून वशाटोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांनी सुचना दिल्यानंतर आजचा वशाटोत्सव अखेर रद्द (Vashatotsav cancel)करण्यात आला आहे. या वशाटोत्सवाला शिवप्रेंमींचा विरोध होता.

पुण्यात आज वशाटोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले होते.

वशाटोत्सव म्हणजे काही फक्त मांसाहारी मेजवानीचा कार्यक्रम नाही. तर तो वैचारिक मेजवानीचा कार्यक्रम असल्याचा दावा आयोजकांनी केला होता, यंदाच्या वशाटोत्सवाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाला वेगळे महत्व प्राप्त होणार, असल्याचेही आयोजकांनी सांगितले होते. राज्यभरातील बहुजन विचारधारेला मानणाऱ्या तरुणांना एकत्रित आणून, त्यांच्या वैचारिक

विश्वाला विधायक मार्गाने समृद्ध करण्याचे काम, करण्यासाठी वशाटोत्सवाचे आयोजन गेल्या काही वर्षापासून करण्यात येत असल्याचे नितीन यादव यांनी सांगितले होते. मात्र, अखेर शरद पवार यांच्या सुचनेनंतर आजचा वशाटोत्सव रद्द करण्यात आला आहे. टीव्ही9 ने हे वृत्त दिले आहे.

ही बातमी पण वाचा : ज्या ५२ लोकांनी पवारांना सोडले त्यातला आमदार झाला नाही, हा महाराष्ट्राचा इतिहास- सुप्रिया सुळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER