आजची गरज – भावनिक बुद्धिमत्ता

Emotional Intelligence

हाय फ्रेंड्स ! जशी करण्याची दुसरी लाट आली तसेच परत सर्वत्र नैराश्य ,भीती, चिंता ,चिडचिड यांचे प्रमाण वाढीस लागले .पहिल्या लाटेचे परीणाम सगळ्यांनी कमी-अधिक प्रमाणात बघितले होते , भोगले होते .नुकतेच कुठे जनजीवन व्यवस्थित सुरू झाले होते ,तर पुन्हा दुसरी लाट आली. याचा परिणाम एेन तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलांवर खूप होणार आहे .त्यांच्या आयुष्यात एक प्रकारची अनिश्चितता झालेली आहे , ही परिस्थिती नक्कीच ताण वाढवणारी आहे. आजच्या या तरुण पिढीला भविष्य बघण्याची परवानगीच नाही. अक्षरशह:” वन डे ॲट ए टाइम” या पद्धतीने एखाद्या प्रौढासारख जगावे लागते आहे.

मुळातच पौगंडावस्थेतील मनस्थिती अलवार असते .स्व विषयक भावना निर्माण होत असतात. आत्मविश्वास व आदर यांचा विकास होत असतो. मी कोणीतरी आहे ,मला मत आहे या भावना जागतात. स्वतःच्या ऍक्टिव्हिटीज आणि अचीवमेंट यातूनच स्वतःचा शोध लागत जातो पण सध्या हा मार्ग बंद आहे. त्याच बरोबर त्यांच्या विकासाच्या पातळीवरील गरजा ह्या खूप भिन्न असतात. बरोबरीच्या मुलांचा ,मित्रांचा सहवास त्यांना आवडतो. त्यातूनच सामाजिक कौशल्यांचा ही विकास होतो. नेतृत्व विकसित होते. परंतु सध्याच्या काळात हे सगळे बंद झालेले आहे. मुळातच सध्याच्या नेटवर्किंग जगात याला मर्यादा पडतातच. त्यातून आता या सोशल डिस्टंसिंग मधून भर पडते ती वेगळीच.

न्यूयॉर्क मधील वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट ब्रिटनी लेमोंडा त्यांनी सांगितले की एका सर्वेक्षणात नात 13 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या या 977 पालकांच्या प्रतिसादावर नजर टाकली तर तीन पैकी एक मुलगी व पाच पैकी एक मुलगा यांना अतितीव्र चिंतेने ग्रासलेले आहे. याला कारण वर्षभरामध्ये मुलांमध्ये सामाजिक संवादातील बदलांचा हा फटका आहे. मुळातच जगभरात दरवर्षी सुमारे 80 लाख लोक आत्महत्या करतात असे 2016 चे सर्वेक्षण आहे .त्यात 17 ते 24 वयोगटातील प्रत्येक शंभर ते दोनशे आत्महत्येच्या प्रयत्नात मागे एक आत्महत्या घडतेच घडते. म्हणजे प्रत्येक 100 मिनिटांमध्ये एक तरुण आत्महत्या करतो असे जागतिक संख्याशास्त्र सांगते. ही अशा प्रकारची आकडेवारी वाचायला देखील खूप भीषण वाटते.

सद्य परिस्थितीत सुसान डफी यांच्या मतानुसार देशभरात सिरीयस सुसाईड प्रयत्नांचे आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ते स्वतः प्रोफेसर ऑफ पेडियाट्ररिक मेडिसिन ब्राऊन यूनिवर्सिटी मध्ये कार्यरत आहेत. एकूणच मुलांच्या खूप इमर्जन्सी केसेस आणि पुरुषांमधील आत्महत्यांचे वाढते प्रमाण असेही एक निरीक्षण सांगते.

सध्या सगळ्याच तरुण मुलांच्याच्या डोळ्यासमोर काही एक ध्येय नाही, त्यामागे हालचाल करता येत नाही. नोकरी धंद्यामध्ये बेरोजगारी किंवा डेली वेजेस वर काम करणारे तरुण ,या सगळ्यांचे आई-वडीलही तब्येतीने कावलेले आणि त्या बरोबरच पैसा मिळवण्यासाठी धावपळ करत असलेले .आणि स्वतः कडे मुलांकडे नोकरी नसल्याने फक्त हात बांधून बसणे,आणि आई वडिलांची धावपळ अगतिकतेने बघणे त्यांना अवघड होऊन बसते.

शाळा सुरू नसल्यामुळे,शालेय गटाची मुले, जास्तीत जास्त वेळ ते सोशल मीडिया वर घालवतात .त्यांच्या झोपेच्या वेळा बदललेल्या आहेत. मैदानी खेळांमध्ये आत्ता त्यांना वेळ फारसा घालवता येत नाही,चांगल्या साहित्याचे वाचन ही होत नाही .एकूणच काय करायचं ? आणि सगळ्याच वयाच्या मुलांची जास्तीची एनर्जी , तिला नेमकी कुठे दिशा द्यायची ? हे पालक व मुले दोघांनाही कळत नाही. आणि त्यातून उलट उत्तर देणे मारहाण करणे, मस्ती करणे ,खोटे बोलणे,चिडचिड अशा सारख्या मानसिक समस्या ही निर्माण होतात.

आपल्या शरीरातील एखादी गोष्ट दुखत असेल तर वेदनाशामक गोळ्या घेऊन वेदना कमी करू शकतो, परंतु एकूणच मनातील वेदना किंवा हुरहूर बरेच जणांना सहन होत नाही. ती जणू जीवन जगण्याची वेदना होऊन बसते आणि मग जीवनातून सुटका करून घ्यावी इतकेच त्याक्षणी वाटते. याला आपण सायकॉलॉजिकल पेन म्हणतो .तेच या आत्महत्यांमागे असते. आजूबाजूच्या व्यक्ती किंवा इतर काही मूळ कारणे याला असू शकतात .कोणी निकामी ,कुचकामी म्हणून हिणवणे, चिडवणे, चिडणे, पान उतारा करणे ,अशावेळी प्रत्येकालाच प्रगल्भ ,शहाणपणा आणि विचारी पण असेलच असे नाही. एकूणच तरुणांचा जीवनाचा अनुभव कमी असतो. सारासार विचार गांभीर्याने करायची जाणीवही नसते .भावनिक हल्लकल्लोळ मनात दाटून येतो. तारतम्य बाळगून निर्णय घेण्याची क्षमता तरुण लोकांमध्ये कमी पडते किंवा तसा कलही नसतो.

सध्याच्या पेंदमिक कारणा व्यतिरिक्त प्रेमातील अपयश,शिक्षण व नोकरीतील ही विशेषतः कारणे तरुणांमध्ये असतात. यात निराशेने बरोबर आपल्याला स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटत नाही. दुसऱ्या कोणी सांगण्यापेक्षा किंवा दाखवून देणे आधी ही स्वतः जगण्यासाठी लायक नाही, अशी स्वतःचीच खच्चीकरण करणारी प्रतिमा मनात निर्माण झाल्यामुळे आयुष्य जगण्याची प्रेरणा राहात नाही .आयुष्याच्या या घडीला स्वतःला प्रेरित करण्याची ऊर्जा माणसाला गरजेचे असते, तेव्हाच नेमकी ही तरुण मंडळी स्वतःलाच समस्येच्या आहारी जातात. तू मला सोडून ,टाकून गेलीस तर आता मी पण तुला सुखाने जगू देणार नाही. ही बदल्याची भावना असते. कित्येक तरुणींसाठी आत्महत्येचा प्रयत्न हा मदतीच्या हाकेसाठी सुद्धा असतो .लग्नाच स्थिरावता न आलेली ,आयुष्याच्या असुरक्षिततेचा व अस्थिरतेचा अनुभव घेता घेता थकलेली स्त्री शेवटी जीव नकोसा झाला आहे ,कोणीतरी मदत करा हो !असे आक्रंदन सांगण्याचा प्रयत्न आत्महत्येच्या प्रयत्नातून करत असते.

दुर्दैवाने तारुण्यावस्थेतच बहुतेक मानसिक व्याधिंची सुरवात होत असते. अशा वेळी भरपूर मानसिक व भावनिक आंदोलनांना सामोरे जावे लागते.त्याचा परिणाम त्याच्या त्यांच्या वर्तनावर झालेला दिसतो. आणि भावना विचार आणि वर्तन यांचा बॅलन्स बिघडून एकूण ही आयुष्याचा बॅलन्स बिघडतो.

एकूण कौटुंबिक वातावरण, आजूबाजूचे वातावरण, शालेय परिसरातील वातावरण ,आर्थिक स्थिती कुटुंबातील भावनिक वातावरण याचा परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्व घडणीवर होतो. आणि त्यातून वर्तन समस्या जन्म घेतात.

त्याची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे सोशल मीडिया. सोशल नेटवर्किंग मध्ये आपण इतरांशी फक्त आयुष्याची चांगली बाजूच शेअर करतो त्यांच्या प्रशंसा मिळवतो. पण प्रत्यक्षात या आभासी समाजाच्या दुनियेतून बाहेर आलं दैनंदिन जीवनाच्या संघर्षाला तोंड देताना आपल्या बरोबर कोणीही नाही ही भावना खूप वेदनादायी तर असतेच पण त्याहीपेक्षा आपले दुःख व्यक्त करायला प्रत्यक्षात कोणीही नाही ही एकटेपणाची जाणीव फारच बोचरी असते. त्यातून आलेली निराशा टोकाचा निर्णय घेऊ शकते. आजूबाजूच्या परिसरातच अशी उदाहरणं आपल्याला दिसून येतात. गरज किंवा स्वेच्छेने एकट राहावं लागणं किंवा सर्वांमध्ये असूनही एकटा वाटणं, हीच भावना मनात भीती, काळजी, अस्वस्थता निर्माण करायला पुरेशी असते. या एक मुठी स्मार्टफोन मुळे संवादातून जितकी जवळीक साधता येते तितकाच टोकाचा एकटेपणही येऊ शकतो.

वरील सगळ्या उदाहरणांमधून आणि परिस्थितीमधून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते , की आज जेवढी गरज अभ्यासातील बुद्धिमत्तेची आहे किंबहुना त्याच्या पेक्षा कित्येक पटींनी गरज ही भावनिक बुद्धिमत्तेची आहे. आणि मुख्य म्हणजे ती आपण घराच्या पाठशाळेत ही देऊ शकतो. सध्याच्या स्थितीत शाळा बंद असेनात का !

भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे अशी क्षमता की ज्यातून स्वतःच्या आणि इतरांच्या भावना आपण ओळखू शकतो आणि समजू शकतो .त्याच प्रमाणे अशा क्षमते द्वारे आपण आपल्या वर्तनाचे नातेसंबंध बाबत जाणीवपूर्वक व्यवस्थापन करू शकतो. मुळात कुठलीही भावना चांगली किंवा वाईट नसते. ती फक्त कम्फर्टेबल किंवा अनकम्फर्टेबल असू शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुद्धिमत्ता आणि भावनिक बुद्धिमत्ता शिकवली जाऊ शकते, ग्रहण केल्या जाऊ शकते, किंवा सुधारल्या जाऊ शकते. ती लवचिक आहे. आणि म्हणूनच ती आजची गरज आहे.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button