कोरोनामुळे आयपीएल संकटात, आजचा सामना अनिश्चित

Maharashtra today

कोरोनाच्या साथीतही खेळली जाणारी आयपीएल 2021 (IPL 2021) स्पर्धा आता कोरोनामुळेच (Corona) धोक्यात आली आहे. कोलकाता ना ईट रायडर्स (KKR)संघातील काही खेळाडू बाधीत आढळून आल्याने आज, 3 मे रोजी अहमदाबाद येथे खेळला जाणारा कोलकाता व बंगलोर(RCB) दरम्यानचा सामना अनिश्चित आहे. यासंदर्भात बीसीसीआय व आयपीएलकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी हा सामना आज होणार नाही अशीच दाट शक्यता आहे.

वृत्तसंस्था एएनआयने केलेल्या व्टिटनुसार वरुण चक्रवर्ती (Varun Chakraborty) व संदीप वॉरियर (Sandeep Warrior) हे बाधीत आढळून आले आहेत. त्याआधी पॅटरसनकमिन्स हा पॉझिटिव्ह आल्याची अफवा पसरली होती. केकेआरच्या तंबूतील काही अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button