आज ‘कॉमेडी सम्राट’ बघायला मिळाला, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर नितेश राणेंची टीका

Nitesh rane & Uddhav THACKERAY

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभेत आपल्या भाषणात विरोधकांच्या आरोपांना आणि टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. पण मुख्यमंत्र्यांचे भाषण विधानसभेतले नसून चौकातलं भाषण होतं, असं वक्तव्य राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर शेलक्या शब्दांत टीका केली.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा ‘कॉमेडी सम्राटा’चं भाषण असा उल्लेख नितेश राणे यांनी केला. आज एक ‘कॉमेडी सम्राट’ विधानसभेत पाहिला आणि ऐकला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण झालेच नाही! कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या भाषणानंतर आपण नटसम्राट बघितल्याचा भास झाला की काय” अशी टीका केली होती. ठाकरेंच्या याच टीकेचा धागा पकडून नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचं भाषण ‘कॉमेडी सम्राट’ भाषण असल्याचं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER