आज आपण क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत – उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर आज आपण क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत. या बद्दल कुणाचही दुमत असण्याची शक्यता नाही. हेच ते ठिकाण आहे जे कोरोना रुग्णांनी तुडूंब भरून वाहत होतं. मात्र, जीवाची पर्वा न करता करोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना मी मानाचा मजुरा करतो. असे म्हणत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोविड योद्ध्यांबरोबरच मुंबई महापालिका प्रशासनाचेही अभिनंदन केले.

राज्याव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलामधील कोविड सुविधा केंद्रात झाली. यावेळी ते बोलत होते.

ते दिवस आठवल्यानंतर आजही अंगावरती शहारे येतात. दिवस-रात्र एकच चिंता होती, तणाव होता. काही हाताशी नसताना पुढे कसं जायचं? हा एक मोठा प्रश्न होता. पण त्या सर्व संकटाच्या काळात ही सर्व लोकं जर आमच्या सोबत नसती, तर आजचं कोविड सेंटर हे अशाप्रकारे पाहायला मिळाले नसतं. हे कोविड सेंटर लसीकरण केंद्राच्या रुपातच पाहायला मिळो असं मला वाटते, पल्या सर्वांना कल्पना आहेच, सुरुवातीच्या काळात मुंबई असो किंवा मग संपूर्ण जगभरात रुग्णालयं अपुरी पडत होती. रुग्णांना बेड मिळत नव्हते. तेव्हा मग युद्धजन्य परिस्थितीत ज्याप्रकारे एखादं काम केलं जातं, त्या प्रकारे काम करून हे कोविड सेंटर उभारण्यात आलं. अनेकांना वाटत होतं, कसं होईल? मात्र हे कोविड सेंटर उभारल्यानंतर आपण मुंबईत आणखी कोविड सेंटर्स उभारली, राज्यामध्ये उभारली आणि यामुळे खूप मोठा आधार आपल्याला मिळाला, असेही मुख्यमंत्री म्हणाले .

दरम्यान मुंबईमधील एकूण ९ केंद्रांवरील ४० बूथवर लसीकरण केले जाणार आहे.बीकेसीमधी लसीकरण केंद्रावर महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची प्रमुख उपस्थिती होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER