आज राज्याला दिलासा, दिवसभरात ७४ हजार ४५ रूग्णांची करोनावर मात

Corona Virus - Maharastra Today

मुंबई :- राज्यात दिवसेंदिवस करोना संसर्ग (Corona) वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय रूग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. अशा परिस्थितीत आज काहीसे दिलासादायक चित्र पाहायला मिळाले आहे. आज ६६ हजार ८३६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असली तरी आज ७४ हजार ४५ रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. तर ६६ हजार ८३६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ७७३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ३४ लाख ०४ हजार ७९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.८१ टक्के झाले आहे. राज्यात आज ७७३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५२ टक्के एवढा आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ७१९९ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ५ लाख २१ हजार १०४ वर पोहोचली आहे. सध्या ८१ हजार १७४ एकूण सक्रिय रुग्ण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button