निकोला टेस्लाने सव्वाशे वर्षांपूर्वी केलेली भाकितं आज वास्तव बनली आहेत

Rochak Mahiti- Maharashtra Today

वीसावं शतक खऱ्या अर्थानं वैज्ञानिकांचं आणि आविष्काराचं शतक होतं. वीजेच्या बल्बपासून विमानापर्यंत मानवी जीवनाचा चेहरामोहरा बदलणारे सर्वच आविष्कार या शतकात लागले. हे शतक गाजवणारे अनेक वैज्ञानिक होते पण हे शतक गावजलं निकोलो टेस्ला नावच्या माणसानं. काळाच्या अनेक वर्ष पुढं त्यांचे विचार होते. म्हणूनच त्यांनी केलेल्या भविष्यवाणी आज शंभर वर्ष उलटूनही खऱ्या सिद्ध होत आहेत (predictions made by Nikola Tesla over three hundred years ago have come true).

महान वैज्ञानिक निकोलो टेस्ला(Nikola Tesla ) यांचा जन्म वर्ष १८५६ मध्ये जन्म झाला. टेस्ला वैज्ञानिक असण्याबरोबरच मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल आणि फिजिकल इंजिनिअर देखील होते. वीजेच्या दिव्याचा शोध लावणारे थॉमस अल्वा एडीसन हे टेस्ला यांचे प्रतिस्पर्धी होते. टेस्ला यांनी वर्ष १८९१ मध्ये टेस्ला कॉइल्सचा शोध लावला. टेस्ला कॉइल्स एक प्रकारचे इलेक्ट्रिक सर्किट असते. ज्याच्या मदतीने कमी करंट आणि हाय वॉल्टेज वीज निर्माण होते. आज याचाच वापर उपकरणांमध्ये होतो. वायरलेस ट्रांसमिशनमध्ये देखील याचा वापर होतो. त्यांनी भविष्याबद्दल केलेल भाकितातलं तंत्रज्ञान आज वास्तव बनलंय.

ड्रोन

१८९८ साली टेस्ला यांनी बीनतारी आणि रिमोट द्यावारे नियंत्रण शक्य असलेल्या यंत्राला जगासमोर आणलं होतं. आज आपण त्याला रिमोटवर चालणारं ड्रोन (Drone) या नावानं ओळखतो. टेस्ला यांना दिडशे वर्षापुर्वीपासून हे माहिती होतं की रिमोटवर चालणारे यंत्र मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनतील. याबद्दल त्यांनी भविष्यवाणी केली होती.

इंटरनेट

जगातल्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात संगीत, कागदपत्रं आणि संकेत पाठवणं शक्य होईल असं भाकित टेस्लांनी केलं होतं. इंटनेट ही संकल्पना रुजायच्या आधी त्यांनी याबद्दल भाष्य केलं होतं. रेडीओच्या आणि दुरध्वनीच्या विकासाचा तो काळ होता या काळात त्यांनी मांडलेली मतं पुढं चालून वीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे १९९० साली वास्तवात उतरली ज्याला आपण ‘वर्ल वाइड वेब’ (WWW)या नावानं ओळखतो.

मोबाईल

अमेरिकेतल्या प्रतिष्ठीत मासिकाला दिलेल्या मुलाखतीत टेस्ला यांनी भविष्यातल्या आणखी एका शक्यतेबद्दल अनुमान मांडलं होतं. आपल्या खिशात सामावणाऱ्या एका लहानशा गोष्टीत सर्व प्रकारचं तंत्रज्ञान सामावलं जाईल असं भाकित केलं होतं. टेस्ला यांनी या तंत्रज्ञानाला ‘पॉकेट टेक्नॉलॉजी’ असं नाव दिलं. पुढं जाऊन टेस्ला यांच भाकित खरं ठरलं. ‘पामटॉप’ म्हणून विकासाला सुरुवात झालेलं तंत्रज्ञान आज ‘मोबाईल’ म्हणून जगभरात ओळखलं जातं.

व्यावसायिक विमानं

टेस्ला यांच्या काळात विमानं विकसीत होत होती. केवळ सैन्य कारवाईंसाठी ही बलाढ्य उड्डाण करणारी यंत्र वापरलं जातील असे सुरुवातीच्या काळात अंदाज होते. पंरतू टेस्ला यांनी भाकित केलं होतं की भविष्यात वाहतूकीसाठी व्यावसायिक विमानं वापरली जातील. तेव्हा कधीच कुणाला त्याचं हे वाक्य खरं वाटलं नसेल पण आज त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरल्याचं चित्रं आहे.

टेस्ला यांच्या नावे आहे रेडीओचं पेटंट

टेस्ला यांनी फक्त काळाच्या पुढची भाकितं केली नाहीत तर त्यांनी विकसीत केलेल्या तंत्रज्ञानामुळं ते काळाच्या पुढचा विचार करतात हे सिद्ध केलं. १८९९ मध्ये त्यांनी ए.सी. करंटद्वारे चालणारी एक मोटार देखील बनवली होती. रेडिओचा शोध देखील मार्कोनी यांच्या ऐवजी टेस्ला यांनी केल्याचे सांगितले जाते. मात्र १२ मार्च १८९५ ला त्यांच्या लॅबमध्ये आग लागली. टेस्ला यांच्या मृत्यूनंतर मार्कोनी यांचे रेडिओचे पेटेंट अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत, हे पेटेंट टेस्ला यांना दिले. वर्ष १८९८ मध्ये टेस्ला यांनी एक रिमोटवर चालणारी बोट देखील तयार केली होती. मानव जातीच्या उद्धासाठी टेस्लांनी दिलेलं योगदान अद्वितीय असल्याचं मानलं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button