आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार, मोठी घोषणा करण्याची शक्यता

CM Uddhav Thackeray

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आज संध्याकाळी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार (Chief Minister will again interact with the peopl) आहे. राज्यातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या, लॉकडाऊन, लसीकरण या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एखादी मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

उद्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करतील. फेसबुक लाईव्हद्वारे ते राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री आज नेमकं काय संवाद साधणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे शासनाच्या उपाययोजनाही कोरोनाची साखळी तोडण्यात तोकड्या पडत असल्याचं चित्र निर्माण झाल आहे. राज्यातील वाढत्या कोरोनामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे देशभरात उद्यापासून १८ वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लसीकरण केले जाणार आहे. या सर्व मुद्द्यांवर उद्धव ठाकरे आज बोलण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button