आज मेरा घर टूटा, कल तेरा घमंड टूटेगा; कंगनाचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Kangana Ranaut & Uddhav Thackeray

मुंबई : मुंबईत पाय ठेवू देणार नाही, या शिवसेनेने (Shivsena) दिलेल्या धमकीला धुडकावत अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आज दुपारी तिच्या मुंबईतल्या खार परिसरातील घरी दाखल झाली. धमकीच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षेच्या गराड्यात कंगनाला तातडीने तिच्या घरी पोहचवण्यात आलं. कंगनाच्या घराबाहेरही चोख सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. घरी पोहचताच कंगनाने  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. ट्विटरवरून एक व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे.

मुखमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत, “आज मेरा घर टूटा, कल तेरा घमंड टूटेगा” असं कंगनानं म्हटलं आहे. “उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटते, फिल्म माफियांसोबत मिळून तुम्ही माझे घर पाडून मोठा बदला घेतला आहे? आज माझे घर तुटले आहे, उद्या तुझा अहंकार तुटेल. हे काळाचे चक्र आहे, लक्षात ठेवा; हे नेहमीच सारखं नसतं. मला वाटतं तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले आहेत. कारण काश्मिरी पंडितांसोबत काय घडलं हे मला आज कळलं. आज मी देशातील जनतेला वचन देते  की, मी केवळ अयोध्येवरच नाही तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवणार आहे. आणि माझ्या देशवासीयांना जागे करणार आहे. कारण जे माझ्याबाबतीत घडलं ते कुणासोबतही घडेल. उद्धव ठाकरे ही क्रूरता आणि दहशत माझ्यासोबत घडली हे चांगलं झालं. जय हिंद, जय महाराष्ट्र.” असे तिने व्हिडीओत म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER