आज राज्यात डिस्चार्जपेक्षा नवीन कोरोना रुग्ण अधिक, तर ४५३ रूग्णांचा मृत्यू!

Rajesh Tope - Coronavirus - Maharashtra Today

मुंबई : आज दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्याच दिवसानंतर कमी आली आहे. आज राज्यात २४ हजार ७५२ नवीन करोनाबाधित (Corona) आढळले असून, ४५३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २३ हजार ६५ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण ५२,४१,८३३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.७६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३८,२४,९५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,५०,९०७ (१६.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,७०,३२६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १९,९४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,१५,०४२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button