
शमिता शेट्टी (Shamita Shetty) ही बॉलिवूडची (Bollywood) यशस्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची लहान बहिण. आज ती 42 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मोठ्या बहिणीप्रमाणे शमितानेही बॉलिवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. तिची सुरुवातही मोठ्या धडाक्यात झाली पण नंतर शिल्पाप्रमाणे शमिताला यश मिळवता आले नाही. शिल्पा शेट्टी आजही सिनेमात काम करीत असली तरी शमिता मात्र बॉलिवूडबाहेर गेल्याचे दिसत आहे. ज्यांना बॉलिवूडमध्ये यश मिळत नाही ते ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळतात त्यानुसार शमितानेही वेब सीरीजमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पण यातही तिला अजून म्हणावे तसे यश मिळताना दिसत नाही. दिसण्यातही मोठी बहिण शिल्पा शमितापेक्षाही जास्त सुंदर दिसत आहे.
बॉलिवू़डमध्ये नेपोटिझमचा मुद्दा नेहमी उचलला जातो पण असेही काही कलाकार आहेत ज्यांचे नातेवाईक बॉलिवूडमध्ये नाव कमावले, पण या कलाकारांना नाव कमवता आले नाही. शमिता ही अशाच काही कलाकारांपैकी एक आहे. शमिताला आजही शिल्पा शेट्टीची बहिण म्हणूनच ओळखले जाते. 2 फेब्रुवारी 1979 ला जन्म झालेल्या शमिताने सेंट एंथोनी गर्ल्स हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर तिने मुंबईच्या सीडेनहॅम कॉलेजमधून कॉमर्सची पदवी घेतली. त्यानंतर तिने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आणि प्रख्यात ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्राकडे इन्टर्नशिप करू लागली. मनीषकडे काम करतानाच मनीषनेच शमिताला सिनेमात काम करण्याचा सल्ला दिला. मनीषने तिला म्हटले होते. तुझ्यात अॅक्टिंगचा स्पार्क आहे. तू सिनेमात काम करण्याचा प्रयत्न कर. त्यानंतर शमिताने 2001 मध्ये ‘मोहब्बतें’ सिनेमातून रुपेरी पडद्यावर आगमन केले. या सिनेमासाठी किला आयफा बेस्ट डेब्यू अॅक्टर (फिमेल) पुरस्कार देण्यात आला होता. तिचे ‘शरारा शरारा’ गाणे खूपच लोकप्रिय झाले होते. शमिता एका रात्रीत स्टार झाली खरी पण हे स्टारडम तिला कायम ठेवता आले नाही.
अपयशाबाबत बोलताना शमिताने सांगितले होते. मी चांगली नायिका झाली असते पण मला काही जणांनी सांगितले की, तू जास्त दिसलीस तर ओव्हर एक्सपोज होशील त्यामुळे कमी पण चांगले सिनेमे कर. मी तसे केले आणि जेव्हा मला माझी चूक कळली तेव्हा खूप उशिर झाला होता. बॉलिवूडमध्ये तुम्ही दिसला नाहीत तर तुम्ही विस्मरणात जाता. आणि बॉलिवूडचा हाच नियम आहे. पण तोपर्यंत खूप उशिर झाला होता असेही शमिताने सांगितले होते.
सिनेमात यश मिळत नसल्याचे पाहून तिने ऑफिस डिझायनिंग करण्यास सुरुवात केली आणि त्यात यश मिळवले. मुंबईत रॉयल्टी नावाचा क्लाब तिने डिझाईन केला असून चंदीगढमध्ये लॉसिस स्पाही तिने तयार केला आहे. यासाठी तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला