आज जागतिक महिला दिन : गुगलकडून महिलाशक्तीचा अनोखा सन्मान

Google-Doodle-Womens-Day

मुंबई :- जगभरात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन (International Women’s Day)म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गुगलने (Google) अनोख्या पद्धतीचे डुडल साकारत महिला शक्तीचा सन्मान केला आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने गुगल व्हिडिओद्वारे हे खास डुडल साकारण्यात आलं आहे. ज्यात ॲनिमेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला दाखवण्यात आल्या आहेत. यात विज्ञान, कला, क्रिडा, मनोरंजन, मीडिया यांसारख्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा समावेश आहे. या गुगलने डुडलच्या माध्यामातून एका अनोख्या पद्धतीने स्त्री शक्तीला सलाम केला आहे.

गुगलने महिला दिनानिमित्त साकारलेल्या डुडलमध्ये सुरुवातीला काही महिलांचे हात एकमेकांच्या हातात दिसत आहेत. त्यानंतर जगभरातील अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे हात दाखवण्यात आले आहेत. या डूडलमध्ये महिलांच्या हातांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यात महिलांचे पहिले मतदान, विज्ञान क्षेत्रातील काम, लेखिका, प्रवक्त्या, निवेदिका, खेळाडू अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला दिसत आहे. आज जगात सर्वच ठिकाणी महिला घराबाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे जगात महिलांचे उल्लेखनीय स्थान निर्माण झाले आहे. अशा महिलांना गुगलने डुडलच्या माध्यमातून अनोखा सन्मान दिला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER