क्रिकेटच्या इतिहासातील आजच्या दिवशी १८९४ मध्ये एका चेंडूवर बनवले होते २८६ धावा, संपूर्ण किस्सा जाणून घ्या

286 runs off 1 ball

क्रिकेटच्या इतिहासातील आजच्या दिवशी १८९४ मध्ये एका चेंडूवर २८६ धावा बनवले होते. ऑस्ट्रेलियात (Australia) खेळल्या गेलेल्या सामन्यात फलंदाजांनी धावा घेण्यासाठी क्रीजवर सुमारे ६ किलोमीटर धाव घेतली होती.

क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हणतात. शेवटच्या चेंडूवर अख्खा सामना उलटतो. भारत (India), इंग्लंड (England), ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये क्रिकेटला रिलीजन प्रमाणे फॉलो केला जातो. जर आपण क्रिकेटच्या इतिहासावर नजर टाकली तर तुम्हाला असे बरेच डाव सापडतील, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण होईल. १८९४ मध्ये आजच्या दिवशी असेच काहीतरी घडले होते जे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

ऑस्ट्रेलियात बनला होता इतिहास
१५ जानेवारी १८९४ क्रिकेटच्या इतिहासात खूप खास आहे परंतु याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ‘व्हिक्टोरिया’ आणि ‘स्क्रॅच XI’ यांच्यात या तारखेला सामना खेळला जात होता. सामन्यात एका फलंदाजाने लांब शॉट मारला आणि चेंडू झाडावर अडकला. यानंतर, फलंदाजांनी धावा घेण्यास सुरवात केली, तर क्षेत्ररक्षक चेंडू शोधत होते.

१ चेंडूवर बनले २८६ धावा
जेव्हापर्यंत क्षेत्ररक्षकाने चेंडू झाडावरून काढला, तो पर्यंत फलंदाजांनी २८६ धाव घेतली होती. दोन्ही फलंदाजांनी क्रीजवर सुमारे ६ किलोमीटर धाव घेतली होती. झाड शेताच्या मध्यभागी होता अशा परिस्थितीत गोलंदाजी साइडने पंचांना आवाहन केले आणि सांगितले कि चेंडू हरवल्याचे घोषित करावे म्हणजे फलंदाज धाव घेणे थांबवतील. तथापि बॉल दिसत होता म्हणून पंचांनी हे नाकारले. अशा परिस्थितीत चेंडू हरवला म्हणून घोषित करणे चुकीचे ठरेल.

या वृत्ताचा एकमात्र स्त्रोत त्या काळातील पॉल मॉल गॅझेट या इंग्रजी वृत्तपत्राला मानले जाते. ही बातमी त्याच्या वर्तमानपत्राच्या क्रीडा पानावर छापण्यात आली होती, असे म्हणतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER