मराठा आरक्षण : संभाजीराजे आज ‘कृष्णकुंजवर’, राज यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष

Raj Thackeray - Sambhaji Raje Chhatrapati

मुंबई :- मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन भाजपचे (BJP) खासदार संभाजी राजे (Sambhaji Raje) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणासाठी ते दोन तीन दिवसांपासून राज्यभरातील अभ्यासक, जाणकार आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहे. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. तर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहेत. मात्र आता हाती आलेल्या माहितीनुसार संभाजीराजे आज मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार आहेत. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संभाजी राजे राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी दाखल होतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मराठा आरक्षणावर राज ठाकरे यांची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणून घ्यायचा संभाजीराजे यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीच संभाजीराजे राज ठाकरे यांना भेटणार असल्याचे समजते. संभाजीराजे यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी शरद पवार यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांना एकत्र येण्याचे आव्हान केले होते. या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे कुठली भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

ही बातमी पण वाचा : ‘पुढाकार घेऊन ठाकरे, फडणवीस, राणेंना एकत्र आणा’, संभाजीराजेंची पवारांना विनंती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button