आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी साधणार संवाद; संध्याकाळी ७ वाजता

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यामध्ये कोरोनाचे (Corona) संकट कमी होत असल्याची चिन्हे दिसत होते. पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होऊ लागली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यासह मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनासह सरकारने उपाययोजनांना सुरुवात केली आहे. निर्माण झालेल्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) जनतेशी संवाद साधणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात जनतेशी संवाद साधून मार्गदर्शन केले. सुरुवातीपासूनच मु्ख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे राज्यातील कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात आणण्यामध्ये यश मिळाले. मात्र फेब्रुवारी महिन्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. प्रशासकीय यंत्रणेकडून ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या दरम्यान, सोशल मीडियाद्वारे मुख्यमंत्री आज संध्याकाळी ७ वाजता जनतेशी संवाद साधून परिस्थितीबाबत माहिती देणार आहे. यावेळी मुख्यमंत्री कोरोना रोखण्यासाठी कोणती घोषणा करणार? तसेच कोणती नवी नियमावली जाहीर करणार, याकडे जनतेचे लक्ष आहे. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती चिंताजनक झाली आहे. महाराष्ट्रामध्ये शनिवारी कोरोनाच्या ६ हजार २८१ रुग्णांची नोंद झाली.

आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले की, “शनिवारी सापडलेल्या ६ हजार २८१ रुग्णांपैकी १ हजार ७०० रुग्णांपेक्षा अधिक किंवा २७ टक्के रुग्ण हे मुंबई आणि अमरावती मनपा क्षेत्रातील आहेत. आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या २० लाख, ९३ हजार ९१३ एवढी झाली आहे. तर ४० जणांचा मृत्यू झाली. मृतांची संख्या वाढून ५१ हजार ७५३ झाली आहे. सध्या कोरोनाचे ४८ हजार ४३९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER