
मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा अस्थिर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या संकटात राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजभवनावर नेत्यांचा राबता वाढला आहे.
तर, दुसरीकडे, राज्यात कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. मुंबईचे वुहान होण्याच्या मार्गावर आहे असेही बोलल्या जात आहे. तर, दुसरीकडे ठाकरे सरकार कोरोनाची स्थिती हाताळण्यास असमर्थ ठरल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. तसेच, कालच्या राज्पाल भेटीनंतर भाजपा नेते नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. त्यामुळे राणेंची मागणी हीच भाजपाची भूमिका आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
तसेच, आज सकाळपासूनच शिवसेना नेते संजय राऊत ट्विट वर ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधत आहेत. राज्यातील सरकार ठाम असताना अस्थिरता निर्माण करण्याचे काम विरोधक करत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.
ही बातमी पण वाचा:- सरकार मजबूत आहे, चिंता नसावी – संजय राऊत
या सर्व पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काय बोलतील याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यातील राजकीय घडामोडी पाहता फडणवीस यांच्या आजच्या पत्रकार परिषदेला महत्त्व आहे. आज दुपारी चार वाजता ते लाकडाऊन नंतर अनेक दिवसांनी पत्रकारपरिषदेतून माध्यमांशी बोलतील.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला