आज राज्यात चिंता वाढली, २४ तासात ६२ हजार १९४ कोरोनाबाधित तर ८५३ मृत्यूंची नोंद

Maharashtra Coronavirus

मुंबई :- राज्यात कोरोनाची (Corona) दुसरी लाट पसरली असून या लाटेत रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी ५६ हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर गुरुवारी पुन्हा या आकडेवारीत वाढ होऊन राज्यात ६२ हजार १९४ कोरोनाबाधित सापडले आहेत. तर ६३ हजार ८४२ रूग्ण करोनामुक्त झाले असून, ८५३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४२,२७,९४० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८५.५४% एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,८६,६१,६६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४९,४२,७३६ (१७.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८,२६,०८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,४०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,३९,०७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button