
मुंबई : मध्य महाराष्ट्रावर (Central Maharashtra) 900 मिटर उंचीवर वाहत असलेले चक्राकार वारे आणि इथुन केरळपर्यंत (Kerala) असलेली कमी दाबाची द्रोणिय स्थिती आणि सोबतच पुर्वेकडुन हवेच्या खालच्या स्तरात वाहत असलेले बाष्पयुक्त वारे. या सर्व हवामान शास्त्रीय परिस्थितीमुळे विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात आज आणि उद्या गारपीटसह वादळी पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये वादळी पाऊस होऊ शकतो. तर मुंबई आणि कोकण परिसर वगळता राज्यातील इतर भागांत 16 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला