आज दिवसभरात राज्यात ६७ हजार १२३ नव्या करोना रुग्णांची नोंद, ४१९ रूग्णांचा मृत्यू

Coronavirus Maharashtra

मुंबई : देशभरासह राज्यातील करोना (Corona) संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधिता आढळून येत असून, राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सध्या महाराष्ट्रात रोज ६० हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहे. आजची आकडेवारी तर चिंतेत पाडणारी आहे. आज दिवसभरात महाराष्ट्रात तब्बल ६७ हजार १२३ करोनाबाधित वाढले असून, ४१९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर १.५९ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ५९ हजार ९७० रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आज रोजी एकूण ६,४७,९३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, आज दिवसभरात ५६ हजार ७८३ रूग्ण बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३०,६१,१७४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८१.१८ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३५,८०,९१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,७०,७०७ (१५.९९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,७२,५८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,६२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,४७,९३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button