कोरोना : आज राज्यात आढळलेत ५,९८४ नवीन रुग्ण

Corona Recovery

मुंबई :- राज्यात आज १५ हजार ०६९ रुग्ण कोरोनामुक्त (Corona Virus) झाले असून उपचाराखालील (ॲक्टिव्ह) रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी झाली आहे. आज दिवसभरात ५ हजार ९८४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४८ टक्क्यांवर पोहोचले आहे. आजही सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जवळपास दुप्पट नोंदवली गेली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८१ लाख ८५ हजार ७७८ नमुन्यांपैकी १६ लाख ०१ हजार ३६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.६६ टक्के) आले आहेत. राज्यात २४ लाख १४ हजार ५७७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २३ हजार २८५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १२५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

Check PDF :- प्रेस नोट १९ आक्टोबर २०२०

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER