आज राज्यात ५ हजार ९६५ नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद, तर ७५ मृत्यूंची नोंद

Coronavirus

मुंबई : महाराष्ट्रात मागील २४ तासात ५ हजार ९६५ करोना रुग्ण करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. राज्यात आज घडीला ८९ हजार ९०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील २४ तासात ३ हजार ९३७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत राज्यात १६ लाख ७६ हजार ५६४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९२.४ टक्के झाले आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

मागील २४ तासात राज्यात ७५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर आहे २.५९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७ लाख २२ हजार १९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख १४ हजार ५१५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला ५ लाख २८ हजार ४६२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ७ हजार ११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

मुंबईत करोनाचे १०६३ नवे करोना रुग्ण

मुंबईत करोनाचे १०६३ नवे करोना रुग्ण मागील चोवीस तासात पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ८८० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण २ लाख ८१ हजार ८७४ जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी २ लाख ५५ हजार ३४५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज घडीला मुंबईत १२ हजार ७५३ रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER