राज्यात आज तब्बल ५७ हजार ६४० नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Maharashtra Coronavirus

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा (Corona) पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. राज्यात आज तब्बल ५७ हजार ६४० कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर ५७ हजार ००६ कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.

राज्यात आजपर्यंत एकूण ४१,६४,०९८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण ८५.३२ टक्के एवढा झाला आहे. तर आज राज्यात ९२० कोरोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,८३,८४,५८२ प्रयोगशाळा नमुन्याांपैकी ४८,८०,५४२ (१७.१९ टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३८,५२,५०१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३२,१७४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button