आज राज्यात ५५ हजार ४११ नवीन कोरोनाबाधित; ३०९ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra Coronavirus

मुंबई :- राज्यात दररोज कोरोना (Corona) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे; शिवाय, रुग्णांच्या मृत्युसंख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारसमोर आता कडक लॉकडाऊनच्या निर्णयाशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचं दिसत आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ५५ हजार ४११ नवीन कोरोनाबाधित वाढले असून, ३०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.७२ टक्के एवढा आहे.

दरम्यान, आज ५३ हजार ५ रुग्ण कोरोनातून बरेदेखील झाले. राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८२.१८ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१८,५१,२३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३३,४३,९५१ (१५.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३०,४१,०८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,२९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button