आज राज्यात २७ हजार ९१८ नवीन कोरोनाबाधित, १३९ रूग्णांचा मृत्यू

Coronavirus

मुंबई :- राज्यात कोरोना (Corona) संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य शासनाकडून कडक निर्बंध लागू केले जात आहेत. तर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांकडून लॉकडाउनचे संकेतही दिले जात आहेत. अनेक शहरात तर लॉकडाउन सुरू देखील केले आहे. आज दिवसभरात राज्यात २७ हजार ९१८ नवीन कोरोनाबाधित वाढले असून, १३९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत ५४ हजार ४२२ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ३,४०,५४२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

याशिवाय आज २३ हजार ८२० रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २३,७७,१२७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८५.७१ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९६,२५,०६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,७३,४३६ (१४.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,५६,६९७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर १७ हजार ६४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button