आज राज्यात २६,१३३ नव्या रुग्णांची नोंद, तर ४०,२९४ रुग्ण बरे होऊन घरी परतले

Maharashtra Coronavirus

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना (Corona) बाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेटही सातत्याने वाढत आहे. राज्यासाठी ही एक मोठी दिलासादायक बाब आहे. ही बाब जरी दिलासा देणारी असली तरी, अद्यापही करोना रूग्णांच्या मृत्यू संख्येत दररोज वाढ सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात ४० हजार २९४ रूग्ण करोनातून बरे झाले असून, २६ हजार १३३ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, ६८२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५१,११,०९५ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९२.०४ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२७,२३,३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,५३,२२५ (१६.९७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,५५,७२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २२,१०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,५२,२४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button