आज राज्यात २५ हजार ६१७ रुग्णांची कोरोनावर मात

Coronavirus Maharashtra

मुंबई : राज्यात आणि विशेषकरुन मुंबईत कोरोनानं प्रकोप केला होता. यात मुंबईमध्ये तर कोरोनानं (Corona) सर्वात जास्त कहर केला. मात्र आता करोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात कमी होत असल्याने राज्याला दिलासा मिळत आहे. मागच्या २४ तासात २५ हजार ६१७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर १५ हजार २२९ जणांना करोनाची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५४ लाख ८६ हजार २०६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४.७३ टक्के एवढं झालं आहे. राज्यात एका दिवसात ३०७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.६८ टक्के एवढा आहे.

राज्यात सध्या २ लाख ४ हजार ९७४ सक्रिय करोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यात १ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे करोना रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे. राज्यात आजपर्यंत ३ कोटी ५७ लाख ७४ हजार ६२६ जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५७ लाख ९१ हजार ४१३ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. राज्यात करोना रुग्णवाढीचा दर १६.१९ टक्के इतका आहे. राज्यात सध्या १५ लाख ६६ हजार ४९० रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ७ हजार ५५ रुग्ण हे संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button