आज राज्यात २२ हजार ५३२ रुग्णांची करोनावर मात, तर १८ हजार ६०० नवे रूग्ण आढळले

Maharashtra Coronavirus

मुंबई : राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांची (Corona) संख्येत किंचित घट झाली असली, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात राज्यात २२ हजार ५३२ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत एकूण ५३ लाख ६२ हजार ३७० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३.५५ टक्के इतकं झालं आहे. तर मागच्या २४ तासात १८ हजार ६०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या राज्यात एकूण २ लाख ७१ हजार ८०१ सक्रीय रुग्ण आहेत.

करोनामुळे राज्यात एका दिवसात ४०२ जणांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.६५ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्या करण्यात आलेल्या ३ कोटी ४८ लाख ६१ हजार ६०८ नमुन्यांपैकी ५७ लाख ३१ हजार ८१५ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज्यातील करोना पॉझिटिव्हीटी दर १६.४४ टक्के इतका आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button