आज राज्यात २० हजार ८५२ रूग्ण कोरोनामुक्त, तर १४ हजार १५२ नवीन करोनाबाधितांची नोंद

Coronavirus new Starin - Maharastra Today

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील करोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत आता घट होत असून, करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. आज दिवसभरात राज्यात २० हजार ८५२ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, १४ हजार १५२ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात दिवसभरात २८९ रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५५,०७,०५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९४.८६ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६०,३१,३९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,०५,५६५ (१६.११ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,७५,४७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,४३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,९६,८९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button