आज दिवसभरात राज्यात १६ हजार ३६९ रूग्ण करोनातून बरे

Maharashtra Coronavirus

मुंबई : देशभरासह राज्यातील करोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या मोठी जास्त असल्याचे निषपन्न होत आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेटही वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात १६ हजार ३६९ रूग्ण करोनातून बरे झाले, तर १० हजार ९८९ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय, २६१ कोरनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५५,९७,३०४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९५.४५ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत १,०१,८३३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, राज्याचा मृत्यूदर १.७४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,७१,२८,०९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,६३,८८० (१५.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,३५,३४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,४९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच, राज्यात आज रोजी एकूण १,६१,८६४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button