राज्यात आज १४ हजार ४३३ रूग्ण कोरोनामुक्त, तर १२ हजार ५५७ कोरोनाबाधितांची नोंद

Maharashtra Coronavirus

मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव अद्यापही कमी होताना दिसत नाही. कोरोना रुग्णांची संख्या जरी नियंत्रणात आली असली तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भावाचे प्रमाण कमी झालेले नाही. परंतु दिलासादायक बाब म्हणजे महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांतील कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे. त्या जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. उद्यापासून या जिल्ह्यात अनलॉक प्रक्रिया सुरु होत आहे. राज्यात मागील २४ तासात १२ हजार ५५७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर एकुण २३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे.

राज्यात आतापर्यंत १४ हजार ४३३ कोरोनाबाधितांनी गेल्या २४ तासात कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत एकून ५५ लाख ४३ हजार २६७ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील बरे होण्याचे प्रमाण ९५.०५ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे. एकुण १२ हजार ५५७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यात आज २३३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.७२ टक्के एवढा आहे.

राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ करोड ६५ लाख ८ हजार ९६७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामधील ५८ लाख ३१ हजार ७८१ कोरोना चाचण्यांचे नमुने सकारात्मक आले आहेत. सध्या राज्यात १३,४६,३८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,४२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button