राज ठाकरेंच्या सभेचा खर्च कुणाच्या नावावर टाकायचा : निवडणूक आयोगाची पंचाईत

EC-raj

मुंबई : एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नांदेडच्या सभेत काय बोलणार याकडे लक्ष लागले असतानाच दुसरीकडे निवडणूक आयोगाला एक वेगळाच प्रश्न सतावत आहे. तो म्हणजे मनसेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नसल्यामुले राज ठाकरेंच्या सभेचा खर्चा कुणाच्या नावावर टाकायचा. यामुळे निवडणूक आयोगाची चांगलीच पंचाईत झाली आहे.

राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते कि मनसे निवडणूक लढणार नाही. मात्र त्याचवेळी आपण भाजप-शिवसेनेच्या सरकारविरोधात प्रचार करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यानुसार त्यांच्या सभा राज्यात विविध ठिकाणी होत आहे. आज नांदेड येथे झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध जोरदार हल्ला चढविला. दरम्यान आजच्या राज ठाकरेंच्या या सभेला काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण उपस्थित राहणार की नाही. ही चर्चासुद्धा होती. मुंबईतील शिवाजी पार्कवरील विराट सभेत राज ठाकरेंनी मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता.