ट्रम्पच्या स्वागताला 70 लाख लोक येण्यासाठी ते काय देव आहेत? : काँग्रेसनेते चौधरी

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौ-यांच्या पार्श्वभूमीवर भाजपावर टीका करताना काँग्रेस नेते खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले ते आमच्यासाठी केवळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. मग त्यांच्या समोर 70 लाख लोकांना उभे करण्याची गरज काय? ट्रम्प काही देव आहे काय? असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला आहे. ट्रम्प यांनी आपल्या भारत दौऱ्याबद्दल बोलताना सांगितले होते की, पंतप्रधान मोदींनी त्यांना म्हटले आहे की अहमदाबाद विमानतळापासून ते मोटेरा स्टेडिअमपर्यंत तब्बल ७० लाख लोकं त्यांच्या स्वागतासाठी आलेले असणार आहेत.

हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणाले, हा माझा आदेश नव्हेच! फौजदारी कारवाई करा

अधीरंजन चौधरी म्हणाले, ट्रम्प यांच्या स्वागतासाठी एवढ्या मोठ्यासंख्येने नागरिकांना गोळा करण्याची काय गरज आहे? आम्ही भारतीय नागरिक त्यांची पूजा करण्यासाठी उभे राहणार नाहीत. ट्रम्प स्वतःच्या फायद्यासाठी भारतात येणार आहेत. भारत दौऱ्यादरम्यान कोणताही व्यापारी करार करण्याची त्यांची इच्छा नाही. म्हणजे ते तेथील बाजारपेठेत आपल्याला येऊ देण्याच इच्छुक नाहीत. ते असे म्हणत आहेत की भारत विकसित झाला आहे. अमेरिका प्रथम हेच त्यांचे धोरण आहे.