चुलत्यांमुळे लागली सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय; अजित पवारांकडून शरद पवारांचे कौतुक

Ajit Pawar & Sharad Pawar

मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नेहमी पहाटे लवकर उठून पाहणी दौरा, बैठका आणि इतर राजकीय कार्यक्रम घेत असतात. आज त्यांनी यामागचे कारण सांगत हे गुण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून घेतले असल्याचं आवर्जून सांगितलं आहे. सकाळी लवकर उठण्याची सवय आमच्या चुलत्यांची (शरद पवार). ते २७ वर्षांचे असताना सकाळी ७ वाजता कामाला लागायचे. आज त्यांचं वय ८० वर्षे पूर्ण असून सकाळपासून काम करत असतात, असे अजित पवार यांनी सांगितले.

पवार म्हणाले की, सकाळी लवकर उठण्याची सवय आजोबांची नाही तर चुलत्याची लागली आहे. आम्ही जसे  बघतोय तसे  चुलते २७ वर्षांचे असताना सकाळी ७ वाजता कामाला लागायचे. रात्री २ वाजता आले तरी सकाळी ७ वाजता काम सुरूच. आताही ते सकाळपासून काम करत असतात, हे आपण पाहतो. शेवटी तुमच्यावर कसे संस्कार होतात त्यावर अवलंबून असतं. सकाळी कामाला सुरुवात केली तर वातावरणदेखील स्वछ असतं. एक उत्साह असतो असेही अजित पवार म्हणाले.

ही बातमी पण वाचा : राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी आलो आणि अडकलो: अजित पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER