राज्य कोरोनामुक्तीकडे; तीन महिन्यानंतर प्रथमच आढळले सर्वात कमी करोनाबाधित!

Coronavirus Maharashtra Active Cases

मुंबई : राज्यातील करोना (Corona) संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. शिवाय, दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनातून बरे होणाऱ्यांची संख्यी ही नियमीत जास्त आढळून येत आहे. राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या तीन महिन्यात आज प्रथमच ९५ टक्क्यांवर गेले आहे. आज दिवसभरात कोरोनाचे २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ५५ लाख २८ हजार ८३४ जण कोरोना मुक्त झाले आहेत, तर १३ हजार ६५९ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.

राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.o१ टक्के झाले आहे. तर, राज्यात आज ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६२,७१,४८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,१९,२२४ (१६.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,००,०५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,८८,०२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button