पर्यटकांचा खर्च उचलणार जपान सरकार ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केली नवीन स्कीम

Japan tourism

मुंबई : जगभरात कोरोनाच व्हायरने थैमान घातले आहे . कोरोनाचे संकट पाहता प्रत्येक देशाने आपापल्या परीने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत, तरीही बऱ्याच ठिकाणी या विषाणूमुळे हजारो लोकांचा जीव गेलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील प्रत्येक सरकार गोरगरिबांसाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे सुविधा लागू करत आहे, आणि या संकटातून देशाला आणि जगाला बाहेर काढण्यासाठी आपापल्या परीने मदत करत आहेत, याच दरम्यान जपान सरकार ने पर्यटकांसाठी एक नवीन स्कीम जाहीर केली.

ही बातमी पण वाचा:- सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदींचे देशवासियांना पत्र 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीअनेक देशांनी लॉकडाऊन घोषणा केली आहे . लॉकडाऊन संपल्या नंतर सुध्दा बरेच पर्यटक फिरायला जाण्यापासून वाचतील पण याच गोष्टीला लक्षात घेत जपान सरकार ने पर्यटक लोकांसाठी एक नवीन स्कीम तयार केली आहे, ज्या स्कीम मध्ये पर्यटक लोकांना आपल्या देशामध्ये पर्यटनासाठी आकर्षित करण्यासाठी एक नवीन स्कीम घेऊन आले आहेत.

द जपान टाइम्स च्या रिपोर्टच्या माहितीनुसार या स्कीम ला जुलै च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू केल्या जाऊ शकते. आताच्या परिस्थिती मध्ये संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे आता जपान मध्ये पर्यटक लोकांना पर्यटनासाठी बंदी घातलेली आहे. पण लवकरच या बंदीला हटवून ह्या स्कीम ला लागू करण्यात येईल असे संकेत जपान च्या या “द जपान टाइम्स” कडून दिल्या गेले आहेत. दिनांक २५ मे ला जापान मधील एमर्जन्सी हटवण्यात आली होती. त्यांनंतर जपान च्या टूरिज्म एजेंसी ने ह्या पॅकेज ची घोषणा केली.

या स्कीम मध्ये जपान सरकार त्यांच्या देशात येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनासाठी येणाऱ्या खर्चाचा अर्धा खर्च जपान सरकार देणार आहे आणि या साठी जपान सरकारने १८.३ बिलियन डॉलर खर्च करण्याचे ठरविले आहे. आणि तेथील टूरिस्ट एजन्सीज ना या बाबतीत पूर्णपणे खात्री आहे की त्यांच्या देशात पर्यटक या स्कीम मुळे आकर्षित होत आहेत .


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER