माझा आवाज दाबण्यासाठीच आनंद तेलतुंबडेंविरुद्ध कारवाई : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

नवी दिल्ली : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे नातेवाईक डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा आंबेडकरांनी केला असून माझा आवाज दाबण्यासाठीच तेलतुंबडे यांच्याविरोधात कारवाई केली जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. येथील महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.

येत्या रामनवमीला अयोध्येत राम मंदिर निर्मितीचा शुभारंभ होण्याची शक्यता

पुण्यातील एल्गार परिषदेशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या नऊ लोकांना नक्षलवादी म्हणत जाणीवपूर्वक त्यांना लक्ष्य केले गेले. डॉ. तेलतुंबडे यांनाही अशाच प्रकारे फसवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले. सरकार मला अडकवू शकत नसल्याने माझा आवाज दाबण्यासाठी तेलतुंबडेंचे नाव जोडले जात असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला.

सद्यःस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थित सरकारविरोधात आवाज बुलंद करणा-यांमध्ये आघाडीवर असल्याने या प्रकरणात मला अडकवणे शक्य नसल्यानेच तेलतुंबडे यांना फसवण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी केला.