मनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवा, या राज ठाकरेंच्या विधानाचे काँग्रेसकडून स्वागत

पुणे : मनसेला प्रबळ विरोधी पक्ष म्हणून मते द्या, या राज ठाकरे यांच्या विधानाचे स्वागतच करायला हवे, असे मत काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी व्यक्त केले आहे. पण राज्यात मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बहुमत मिळून सत्ता मिळेल, असा दावा विश्वजित कदम यांनी केला आहे. मनसे राज ठाकरे यांच्या सध्या राज्यभर प्रचारसभा सुरू आहेत. यातून राज ठाकरे सत्ता मिळविण्याऐवजी विरोधी बाकांवर बसण्यासाठी मते मागत आहे.

राज्यात 288 जागा एकटे भाजप लढवत नाही आहे. आम्हीही मैदानात आहोत, असा टोलाही विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. समोर लढायला कुणी नाही, असे म्हणून मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीचा अपमान केला असल्याचे ते म्हणाले.

13 ऑक्टोबरपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातील प्रचार दौरा रविवार, सुरू होत आहे. ज्योतिरादित्य शिंदे, सचिन।पायलट हेही महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. राज्याच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठीच भाजपकडून 370 सारखे मुद्दे आणले जातात. मात्र, देशातील जनता आमच्यासोबत असल्याचे विश्वजित कदम यांनी सांगितले आहे.

देशातल्या मॉब लिंचिंग व इतर विषयांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले म्हणून खटला दाखल करण्यात आला आहे. आता देशातील सध्याची स्थिती व इतर सामाजिक मुद्यांवर मोदी यांना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाचे नेते सचिन सावंत यांनी मंत्रालयात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली.