मोदींना पुन्हा निवडून द्या : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अमित शहांनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

amit_Shah_

नवी दिल्ली :- 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत रणशिंग फुंकले. भारताच्या विकासाच्या मुद्दांवर असलेल्या या निवडणुकात पराक्रमाची पराकाष्ठा करत मोदींना पुन्हा जिंकून देण्याचे आवाहनच शहा यांनी आज केले. काश्मीरपासून ते केरळपर्यंत पूर्णपणे भाजपचे सरकारच येईल, असा दावाही त्यांनी केला.

‘अब की बार फिर मोदी सरकार’ हा नारा नवी दिल्लीतील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत देण्यात आला आहे. यावेळी भाषणात अमित शहा यांनी काँग्रेस, महाआघाडीवर टीका केली.
मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील 12 कोटी घरांमध्ये टॉयलेट नव्हते. त्यातल्या 9 कोटी घरांमध्ये पाच वर्षं व्हायच्या आधी टॉयलेट्स बांधले. 2014 साली चार कोटी लोक अर्थतंत्राशी जोडले नव्हते मात्र दोन वर्षांच्या काळात 6 कोटी लोकांचे बँक अकाऊंट्स उघडले गेले.

एकेकाळी काँग्रेस विरूद्ध संगळे असे होते आता भाजप विरूद्ध सगळे आहे, असे सांगताना शहा म्हणाले, ज्याप्रकारे उत्तरप्रदेशात 325 जागा जिंकत भाजपने प्रचंड यश मिळवले.. आता तिथे आत्या-भाचा एकत्र येत आहे. जे कधी एकमेकांना पाण्यात पाहात होते, ते आता हात मिळवत आहे. कारण, त्यांना माहिती आहे की, मोदींना एकट्याने हरवणे शक्य नाही

संपूर्ण जगात मोदींसारखा लोकप्रिय नेता नाही, जो लोकांना धरून ठेवेल.. युती म्हणजे काय असते.. युती म्हणजे केवळ त्या त्या राज्यातील पक्षाचे कडबोळे असते. 2014 मध्ये केवळ 6 राज्यांमध्ये भाजपचं सरकार होते. 2019 च्या निवडणुकांच्या वेळी देशात 16 राज्यांत भाजपचे सरकार आहे

2019 च्या निवडणुका या दोन विचारसरणींच्या निवडणुका असतील, असे सांगून मोदी म्हणाले, एकीकडे मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे 35 पक्ष आणि दुसऱीकडे असा पक्ष आहे ज्यांच्याकडे ना नेता आहे, ना नेतृत्त्व आहे. आम्हाला खात्री आहे की 2019 च्या निवडणुका आम्ही बहुमताने जिंकू. स्टार्ट अप कऱणाऱ्या तरूणासाठी, घरात पहिल्यांदा सिलेंडर लावलेल्या म्हातारीसाठी, घरात पहिल्यांदा टॉयलेट बनलेल्या बहिणींसाठी ही बाब महत्त्वाची आहे.

शहा म्हणाले, भारताच्या 1700 वर्षांच्या इतिहासात एक काळ असा होता की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, पेशवे यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्ययुद्ध झाले त्यानंतर पानीपतचे युद्ध झाले. 130 युद्ध जिंकणारी मराठा सेना हे एक निर्णायक युद्ध हरली आणि त्यानंतर भारत 200 वर्षांच्या गुलामीत गेला. सुरूवातीच्या काळात आमचे काम केवळ 6-7 राज्यांपर्यंतच मर्यादित होते. मात्र, 2014 मध्ये मोदींचे सरकार आले आणि 30 वर्षांनंतर पहिल्यांदा देशाला बहुमताचे सरकार मिळाले.