मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने सुरु केल्या हालचाली

PM Modi,Congress

नवी दिल्ली : या लोकसभा निवडणुकीत 2014 सारखे वातारण नसून भाजप आणि मित्रपक्षांना बहुमत मिळणार नाही असे काँग्रेस आणि विविध पक्षांना वाटत असल्यामुळे काँग्रेसने आपल्या सगळ्या दिग्गज नेत्यांना कामाला लावले आहे. यासाठी काँग्रेस एक ‘मास्टर प्लान’ तयार करत आहे.

काँग्रेसने एकदा 100 चा आकडा पार केला की सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल असेही या नेत्यांचा अंदाज आहे. तर भाजपला या निवडणुकीत भाजपला 100 जागांचा फटका बसेल असा अंदाज काँग्रेसला आहे. त्याचा फायदा पक्षांना होईल आणि तेच किंग मेकर होतील अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर 44 वरून काँग्रेसच्या जागांची संख्या 100 च्या जवळपास असेल असे पक्षात्या जाणकार नेत्यांना वाटत आहे.

सोनिया गांधीच आपल्या जुन्या विश्वासू सहकाऱ्यांसह आघाडी सांभाळण्यासाठी सज्ज झाल्या असून त्यादृष्टिने रणनीती तयार करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवातही झाली आहे. राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी काही पक्षांना संकोच वाटू नये यासाठी सोनियांनीच आघाडी सांभाळण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक बोलवली आहे. यासाठी स्वत: सोनिया गांधी यांनी सर्वांना वैयक्तीक पत्र लिहले आहे. इतकेच नव्हे तर जे पक्ष युपीए आणि एनडीएचा भाग नाहीत. त्यांना देखील सोनिया गांधींनी पत्र लिहीले आहे.

निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुतम मिळणार नसल्याचा अंदाज अनेक सर्व्हेतून व्यक्त केला गेल्याच्या पार्श्वभूमीवर खुद्द सोनिया गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदींना चेकमेट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने निवडणुकीच्या आधीच सरकार स्थापन करण्यासाठी हलचाल सुरू केल्या आहेत. सोनिया गांधी यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी 23 मे रोजी होणाऱ्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.

विशेष म्हणजे 23 तारखेलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सूत्रांकडून समजते.

अहमद पटेल – सगळ्या राजकीय हालचालींवर नजर ठेवून पुढची रणनीती तयार करणे आणि त्या सगळ्या घडामोडींचा अहवाल सोनिया गांधी यांना पोहोचवणे. सत्ता स्थापनेसाठी सर्व पूर्व तयारी करणे अशोक गहलोत – यांचे राहुल गांधी आणि सोनिया गांधी या दोघांशीही अत्यंत चांगले संबंध आहेत. त्यामुळे छोट्या प्रादेशीक पक्षांशी संवाद साधण्याचे काम राजस्थानचे मुख्यमंत्री असलेल्या गहलोत यांना देण्यात आले आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे औद्योगिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रात उत्तम संबंध आहेत. त्यामुळे रसदपुरवढ्यासाठी सज्ज राहा असे त्यांना सांगण्यात आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणाचे चंद्रशेखर राव आणि आंध्रचे नेते जगन रेड्डी यांच्याशी चर्चेची जबाबदारी कमलनाथ यांच्यावर देण्यात आली आहे.