अपारंपरिक ऊर्जेमध्ये करणार पाच वर्षात ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

अपारंपरिक ऊर्जा

मुंबई : अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात राज्यात येत्या पाच वर्षात ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे . यासंबंधीच्या धोरणात राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.

या धोरणांतर्गत दरवर्षी १ लाख सौरकृषीपंप शेतकऱ्यांना दिले जातील. आज शेतीला रात्री पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होतात मात्र सौर ऊर्जा कृषी पंप त्यामुळे दिवसा वीज मिळू शकेल.

येत्या पाच वर्षात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या माध्यमातून १७ हजार ३८५ मे. वॅट. वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या धोरणांतर्गत राज्यातील जलाशयांवरही तरंगते सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रमांतर्गत प्रतिवर्षी १० हजार घरांना सौरउर्जेद्वारे वीज पुरवठा करणे प्रस्तावित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER