काठावर बहुमत : संख्या वाढवण्यासाठी ग्रा. पं. सदस्यांना लॉटरी

Gram Panchayat

कोल्हापूर/सोलापूर : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Elections) जिथे सत्ता स्थापण्यासाठी पॅनेलला काठावरचे बहुमत मिळाले आहे, तिथे सत्ता बळकट करण्यासाठी सदस्यांना फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सदस्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी त्यांच्या सहलीचा आनंद पुरवण्याशिवाय इतरही प्रलोभने देणे सुरू आहे.

कोल्हापुरात (Kolhapur) काठावरील बहुमत असलेल्या गावात सदस्य फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. शिरोळच्या उदगाव मध्ये स्वाभिमानीचे सदस्य कलीमुन नदाफ महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) गोटात दाखल झाले आहेत.

उदगाव ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीला ८ तर स्वाभिमानीला ९ जागा मिळाल्या होत्या. आता नदाफ यांनी महाविकास आघाडीच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता येईल. दरम्यान, स्वाभिमानीकडून नदाफ यांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सोलापुरातही सरपंचपदाची लॉटरी जाहीर होताच काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये फोडाफोडी सुरू झाली आहे. करमाळा तालुक्यातील देवळाली, हिवरवाडी, मांगी, साडे, देवीचामाळ ग्रामपंचायतीत काठावर बहुमत आहे. संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी अनेक सदस्यांना सहलीला नेले आहे. अनेक ठिकाणी अपक्ष सदस्यांचा ‘भाव’ चांगलाच चढला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER