
मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्याविरोधातील मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आज सोमय्या पुन्हा ईडी कार्यालयात पोहचले. यावेळी त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या प्रकरणातीची माहिती ईडी (ED) अधिकाऱ्यांना दिली, अशी माहिती मिळत आहे. एवढेच नाही तर शिवसेनेच्या आणखी एका नेत्याला एक्स्पोज करणार, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.
सरनाईक यांच्या नावावर ११२ सातबारे असल्याची माहिती सोमय्या यांनी ईडीला दिली होती. दरम्यान, प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. सोमय्या यांनी १६ डिसेंबरला ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले. सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीला पालिकेचा परवाना नाही. ही इमारत अनधिकृत आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार करणार आहे, असे सोमय्या यांनी सांगितले होते. त्यानंतर दोन दिवसात त्यांनी तक्रार दाखलही केली.
नेक्स्ट टार्गेट कोण?
दुसरीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार, असे ट्विट केले आहे. सोमय्या यांच्या या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. भाजपाच्या रडारवर हा नेता कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. “संजय राठोड (Sanjay Rathod) गेले. आता दोन दिवसात मी पुराव्यांसह शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा उघड करणार आहे.” असे ट्विट सोमय्या यांनी केले आहे.
या ट्विटमध्ये कोणत्या शिवसेना नेत्याचा पर्दाफाश होणार, याचा उल्लेख नाही. तसेच शिवसेनेचा हा नेता मुंबई, ठाण्यातील आहे की, इतर कोणत्या जिल्ह्यातील आहे, यादेखील सुवाच्य नाही. सोमय्या यांनी ट्विट करताना त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना टॅग केले आहे. त्यामुळे दोन दिवसात सोमय्या कोणत्या नेत्याचा पर्दाफाश करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#ShivSena #SanjayRathod is Out. I am to Expose with Documentary Evidences Scam of another Shivsena Leader in next 2 Days @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 28, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला